मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – तौकते चक्रीकादळाचा जबर फटका रत्नागिरी, सिंधुदुर्गला बसला आहे. या दोन्ही जिल्हय़ांतील वादळग्रस्तांना धीर देण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे जाणार आहेत.
सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री रत्नागिरी विमानतळावर पोहोचणार असून त्यानंतर ते जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 9.40 वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे पोहोचून मालवणातील वायरी येथे 10 वाजता भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.
सकाळी 11.05 वाजता निवती येथील नुकसानीची पाहणी करणार असून 11.30 वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृहात नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमकेत आढावा बैठक घेणार आहेत.






