भुसावळ (गिरीश पवार) – 26 जुलै कारगील दिनाचे औचित्य साधून मराठा समाज बहुउद्देशीय संस्था वरणगांव च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले व डॉ.नितीन बढे यांनी कारगील येथे घडलेल्या प्रसंगाला उजाळा देऊन उपस्थितांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी उपस्थित मराठा समाज अध्यक्ष दिपक मराठे, डॉ. नितीन बढे, अरूण दादा सोनवणे, सुधाकर मोते सर, पंकज पाटील, मनोज देशमुख सर, वाय.आर.पाटील सर, रवी पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.







