शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – साई निर्माण उद्योग समूह व साई द्वारकामाई प्रतिष्ठान यांच्यावतीने साईबाबा हॉस्पिटल व साई आश्रम येथील कोविड रूग्ण तसेच दोन्ही हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी परिवारक, परिचारिका, वार्डबॉय यांना फळे आणि राजगिरा लाडू साई निर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांच्या हस्ते रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कोविड काळात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार तसेच फळांची अत्यंत गरज असल्याने साईनिर्माण उद्योग समुहाच्यावतीने येथील साईबाबा रुग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये रुग्णांची व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वेळोवेळी दखल घेतली जात असून शुक्रवारी सकाळी साईबाबा रुग्णालयाचे डॉ. प्रितम वडगावे, डॉ. दिपक कांदळकर, डॉ. अविनाश जाधवर, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, श्री. तिडके यांच्या उपस्थित फळे व राजगिन्याचे लाडूची ७५० पॉकेट देण्यात आली.

यावेळी या उपक्रमासाठी साई द्वारकामाई प्रतिष्ठाणच्या सदस्यांसह भरत चांदोरे, तुषार चौधरी, गडाख पाटील, योगेश गायकर, ताराचंद कोते, सदानंद साबळे, मदन गोंदकर, गोरख कोते, मोरे, सचिन गोंदकर, बबलू कोते, सुनिल लोहकणे, रुषीकेश माळी, संतोष ढगे, जितेंद्र रावते, संदिप आहेर, मंगेश वाणी, सागर पाडेकर, अमोल सोमवंशी, नितीन गायकवाड, स्वप्निल सोमवंशी, अथर्व कोते, सचिन सोमवंशी, महेश नागरे, विजय वाणी, शुभम कोते, सनी त्रिभुवन, मयुर कोते, हर्षद कोते, आकाश कोते, साई कोते, संकेत कोते, प्रतिक कोते आदींनी विशेष परिश्रम घेतले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ताराचंद कोते यांनी सांगितले.






