शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारूचे 1300 लिटर रसायन नष्ट करण्यात पोलिसांना यश

भुसावळ (गिरीश पवार) – तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात होती. याबाबत माहिती मिळताच तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी कर्मचार्यांसह दारू भट्टीवर छापा टाकला. त्यात सुमारे 1300 लीटर कच्चे रसायन जागेवरच नष्ट करत सुमारे 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शुक्रवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांसह कारवाई करत 1300 लिटर रसायन नष्ट केले . 60 लिटर तयार दारू जप्त केली. एपीआय अमोल पवार , हवालदार विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम शेख , अजय माळी ,प्रदीप इंगळे यांनी ही कारवाई केली. हिरू गवळी ( रा. कन्हाळा) यास अटक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here