जळगांव (निलेश पाटील) – शहरातील कोरोनाविषयक पाहणी करण्यास आलेल्या केंद्रीय समिती सदस्यांनी शिवाजी नगर प्रभागात सर्वेक्षण करणारे धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक विनायक पाटील व टीम यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रिय समितीचे कुणालकुमार, अरविंद कुशवाह, डॉ.बॅनर्जी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी,नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक राजेंद्र मराठे तसेच आरोग्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे व मनपा अधिकारी तसेच शिवाजी नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.







