राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मुस्लिम नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते गफ्फार मलिक यांचे निधन

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे सोमवारी रात्री येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा एक आघाडीचा मुस्लिम नेता हरपला आहे.हाजी गफ्फार मलिक यांना किरकोळ आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच मलिक यांची तब्येत खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हाजी गफ्फार मलिक यांनी जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले होते. तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळख जायचे. मात्र, सुरेश जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मलिक हे मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी पक्ष सोडला नाही. यानंतर पक्षाने त्यांच्यावर अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणून लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले होते.

तत्कालीन जळगाव नपाचे ते सभापती होते. इकरा उर्दू एज्युकेशन सोसायटीचे सचिव, अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष, मुस्लिम इदगाह कब्रस्थानचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुली असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here