जोगेश्वरीत रिपब्लिकन पक्षातर्फे रक्तदान शिबिर संपन्न – केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवलेंनी दिली भेट

मुंबई (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – कोरोनाच्या संकटकाळात जनतेला सर्व पदध्तीने मदत करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे रक्तदान शिबिर सारखे उपक्रम राबविले पाहिजे तसेच ऑक्सिजन प्राणवायू आहे त्यासाठी पर्यावरण वाचविण्यासाठी झाडे लावा झाडे वाढवा हा उपक्रम ही रिपाइं कार्यकर्त्यांनी घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

यावेळी रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे, गूजराती विभागाचे अध्यक्ष जयंतीभाई गडा, मुंबई प्रदेश चिटणीस रतन आस्वारे, उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव,उ.प.मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल व गोरेगाव तालूका अध्यक्ष रमेश वि. पाईकराव,मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सलमान खान, उ.प.जिल्हासचिव रमेश पाळंदेजी, यूवती आघाडी उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष रेश्मा खान, उ.प.मुंबई प्रमूख संघटक बाबूराव बनसोडे, उ.प.जिल्हा उपाध्यक्ष विश्वास गजघाटे, यूवक गोरेगाव तालूका उपाध्यक्ष बबलू ढवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदान शिबिराचे रिपाइं आणि अलका सुर्वे सेंटर यांनी संयुक्तपणे केले. आयोजक रिपाइं मुंबई सचिव सुनील पवार उद्योजक बाबरजी आदींनी केले अनेक रिपाइं कार्यकर्ते अनेकांनी यावेळी अंधेरी गोरगाव जोगेश्वरीतील अनेक नागरिकांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here