श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहर व तालुक्यात कोविडच्या या महाभयंकर दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या तीन महिन्यांपासुन टीम कोविड केअर ही सक्रीय पणे सामाजिक भान ठेऊन कार्य करत आहे.ज्यामध्ये सुरुवातीच्या अटीतटीच्या काळात रुग्ण प्राथमिक स्तरावर असताना त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यापासून ते दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यापर्यंत,त्याचप्रमाणे समाजहितासाठी जनजागृती चा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तालुक्यात जनजागृतीची रिक्षा फिरवणे असेल किंवा रात्रंदिवस रुग्ण कल्याणा करिता झटणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छतेची काळजी घेताना टीमने स्वखर्चाने स्वच्छता कर्मचाऱ्या ची केलेली नेमणुक असेल अशी अनेक विधायक कामे टीम काम करत आहे.
याचाच एक भाग म्हणुन ग्रामीण रुग्णालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथील कोविड सेंटर याठिकाणी रुग्णांना नित्य वापराकरीता कचरा पेट्या अर्थात डस्ट बिन ची आवश्यकता असल्याने टीम कोविड केअरने 70 डस्ट बिन लगेचच देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूरचे प्रभारी डॉ.योगेश बंड, डॉ.तौफिक शेख,डॉ. कौस्तुभ शेवंते,श्री. करपे, डॉ.असीम सय्यद व अन्य सहकारी उपस्थित होते. टीम कोविड केअरचे सदस्य सर्वश्री ऍड.समीन बागवान, कॉ.जीवन सुरुडे, शरीफ शेख,चंदू मोरे,नईम शेख,रवी त्रिभुवन सर,अकबर पठाण, कॉ. श्रीकृष्ण बडाख,महेबूब प्यारे,मुद्स्सर शेख,जावेद पठाण,फयाज इनामदार हे हजर होते. अमनप्रितसिंग सेठी यांनी देखील यावेळी 1000 हँड ग्लोव्हज ग्रामीण रुग्णालयास दिले. डॉ.योगेश बंड, डॉ.तौफिक शेख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी यावेळी टीम कोविड केअरचे या कार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.






