फडणवीसांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पद वगळले

मुंबई (हितेश मिस्त्री) – मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी ६१ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्‍छांचा वर्षाव होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्‍छा देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख केलेला नाही. फडणवीस यांच्या या भूमिकेवर नेटिझन्सकडून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

”मा. उद्धवजी, @OfficeofUT आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या शुभकामना! ”असे ट्विट करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र, काही लोकांनी या ट्विटवर आक्षेप घेत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना दिलेल्या शुभेच्छांचे दाखले देत ”आदराने केलेले ट्विट बघा फडणवीस साहेब पण तुम्ही “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख” लिहायला विसरलात” अशी आठवण करून दिली आहे. तसेच, दुसऱ्या एकाने तर मुख्यमंत्री लिहायचं मुद्दाम ठेवलेलं दिसतंय, असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here