बीड (सुमित निसर्गंध) – सध्या जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर लस तयार करत आहेत. परंतु लस तयार होईपर्यंत नागरिकांनी विनाकारण आपल्या घराबाहेर न पडता शासनाला सहकार्य करून आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ अभिजित सायंबर यांनी आष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. सध्या कोरोनाचे रुग्ण हे आष्टी शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुध्दा आढळून येत आहेत. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी शासन विविध प्रकारच्या उपाय योजना राबवित आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल डिस्टनसिंग, उत्तम प्रतीचे मास्क चेहऱ्यावर बांधावे, बाहेरून आल्यावर सॅनिटायझरने हात धुवावीत, गर्दीत जाणे टाळावे, वाफ घेणे, जर कोणाला सर्दी झाली असेल, खोकला येत असेल, घशात खवखव होत असेल, ताप येणे, नाकातून पाणी येणे, तीव्र डोके दुखी, मळमळ होने असे लक्षण आढळून आल्यास त्यांनी नजीकच्या रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, शुगर, किडनी विकार, दमा, श्वसनाचे विकार यांनी या काळात विशेष काळजी घेतली पाहिजे. शासन वेळोवेळी नागरिकांना नियम पाळावे असे आवाहन वारंवार करत आहे त्यास नागरिकांनी ही उत्तम प्रतिसाद देणे आवश्यक असून नागरीकांनी भीती न बाळगता नियम पाळावे असे आवाहन करत ज्या रुग्णांनी कोरोना आजारवर मात केली आहे अशांनी आपला प्लाझमा देऊन कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही डॉ अभिजित सायंबर यांनी यावेळी केले आहे.
(डॉ अभिजित सायंबर हे एमबीबीएस एमडी असून फुफ्फुसरोग तज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, केएम हॉस्पिटल, औरंगाबाद, पुणे, मुंबई तसेच विविध ठिकाणी कार्य केले. तसेच अंबेजोगाई लातूर, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे.)







