पुणे (विशेष प्रतिनिधी ईश्वर बजाज) – लॉकडाऊनच्या काळाच तर कोरोना बाधितांच्या आकड्याच सर्वाधिक वाढ पुण्यात झाली आहे. असे असताना देखील अतिशय गजबजलेल्या समजल्या जाणाऱ्या पुण्याच्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडलेला नाही.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून या रेड लाईट एरिया मध्ये ग्राहकाचं येणे कमी झालं. या परिसरात जाणारे सर्व रस्ते पत्रे आणि काठ्या लावून बंदही करण्यात आले होते. या परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांनी कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं. तसेच काही सामाजिक संस्थांनी ही वेळोवेळी येथील महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रबोधन केलं. मात्र त्यांच्या उत्पन्नाचेच साधनच बंद असल्याने, त्यांच्या उपासमारीची वेळ आली होती.
त्यांच्या या परिस्थितीत त्यांना मदत करण्यासाठी बुधवारपेठ भागात १५० कुटुंबांना फूड किटचे वितरण करण्यात आले. या फूड किट वितरणासाठी आरएमसी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी किट उपलब्ध करून दिले होते. त्यासाठी आरएमसी मार्केटिंगचे संचालक संजय सिन्हा यांचे आभार मानण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुक्रवारपेठ पोलिस चौकीच्या पीएसआय तेजस्वी पाटील, समाजसेविका अलका गुंजन यांचे विशेष सहकार्य लाभले. अजूनही येथील अनेक कुटुंबांना फूड किटची गरज असून, त्याकरिता या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयक्यू मिडीया आणि मल्टी सर्व्हिसेसचे ईश्वर बजाज यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांच्या 9545552211 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.






