अहमदनगर (विशेष प्रतिनिधी अक्षय खराडे) – अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाची तालुका पदाधिकारी निवड प्रदेशाध्यक्ष श्री . सुनिल गव्हाणे ,राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके , आ . नरेंद्र घुले, आ . चंद्रशेखर घुले, सभापती डॉ . क्षितीज घुले व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजाजन भांडवलकर यांच्या मान्यतेने व शिफारशीनुसार नेवासा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवपदाधिकारी भरीव कार्य करतील व पक्ष संघटना मजबुतीने उभी करतील या अपेक्षेसह नूतन कार्यकारिणीची निवड केल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजाजन भांडवलकर यांनी बुलंद पोलिस टाइम्सशी बोलताना सांगितले.
नवनियुक्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पार्टी नेवासा तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे सागर सोपान महापूर – तालुकाध्यक्ष, महेश सदाशिव भणगे – उपाध्यक्ष, अन्वर नवाब शहा – उपाध्यक्ष, शुभम केशव गव्हाणे – उपाध्यक्ष, अमन अन्सार सय्यद – उपाध्यक्ष, संकेत पोपट कर्जूले – उपाध्यक्ष, अभिराज मिनिनाथ आरगडे – तालुका कार्याध्यक्ष, प्रसाद जनार्धन पटारे – कार्याध्यक्ष, अभिजित राजेंद्र करडक – शहराध्यक्ष, प्रसन्न हरिदास लांडे – चिटणीस, सौरभ संजय वायकर – सरचिटणीस, सोहेल शफीक सय्यद – सरचिटणीस, विराज सुनिल देशमुख – सहसचिव, शुभम कानिफनाथ गायकवाड – सहसचिव, आकाश बाबासाहेब दिवटे – संघटक, शुभम संजय घोरपडे – संघटक, विजय भास्कर भणगे – सचिव, सचिन बाबासाहेब पटारे – सदस्य, मुबीन रुबाब शहा – सदस्य, रोहित रमेश फोपसे – सदस्य, सुनिल राजेंद्र लकडे – सदस्य
ही निवड पार पडल्यावर सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे आ. नरेंद्र घुले पाटील, आ. चंद्रशेखर घुले पाटील, डॉ. क्षितिज भैय्या घुले पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष प्रसाद कर्णावट, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अँड. शुभमभाऊ बंब, माजी नेवासा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आरगडे आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





