जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान कडून आज सुनील दाभाडे यांच्या जन्मदिनानिमित्त हरिविठ्ठल येथील भिलाटी वस्तीमध्ये कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्या हाताने अन्नदान करण्यात आले.

परिसरातील वृध्द महिलेला किराणा देण्यात आला. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक जी दाभाडे जि,प, शिक्षक विजय लुल्ल्हें, पत्रकार दीपक महाले, पोलीस सेवा संघटनेचे सदस्य हर्षाली पाटील , दिव्य मराठीचे आबा मकासरे आदी उपस्थित होते.






