खा.रक्षाताई खडसे यांनी रावेर ग्रामीण रुग्णालय येथे कोविड रुग्णासाठी दिल्या उपयुक्त औषधी

रावेर (प्रतिनिधी विनोद कोळी) – रावेर लोकसभेचे खासदार रक्षाताई खडसे ग्रामीण रुग्णालय रावेर येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी, सॅनीटायझर व मास्क स्वखर्चाने पुरविण्यात आली. तसेच कोविड सेंटर व लसीकरण केंद्रात रुग्ण व लसीकरणास आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची माहिती घेतली. येथील ऑक्सिजन सुविधेविषयी माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या.

rakshatai-khadse

यावेळी त्यांच्यासोबत जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, प.स.सभापती कविताताई कोळी,गोपाळ नेमाडे, माधुरीताई नेमाडे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, यु.मो.ता उपाध्यक्ष अजिंक्य वाणी, प.स.सदस्य योगिता वानखेडे, सुनिल पाटील, महिला आघाडी ता.अध्यक्षा रेखा बोंडे महिला आघाडी ता.सरचिटणीस जयश्री पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी, जितेंद्र पाटील, मनोज श्रावक, प्रल्हाद पाटील, शुभम पाटील, बाळा आमोदकर, उमेश महाजन, अरुण शिंदे, गणेश मराठे, तहसिलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, उप गटविकास अधिकारी सोनवणे, डॉ.पवन पाटील, डॉ.महाजन, डॉ.पाटील, इ. उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here