बॉलिवूड दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ला हृदयविकाराचा झटका

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – सोशल मीडियावर नेहमीच विविध आणि सामाजिक मुद्यांनावर आपले मत व्यक्त करणारा बॉलिवूड दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ची तब्येत बिघडली आहे.

रविवार छातीत दुखू लागल्यामुळे अनुरागला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केले केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. दरम्यान, डॉक्तरांनी अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजले की अनुराग कश्यपच्या हृदयात ब्लॉकेज आहेत. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल केले. आता हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अनुरागची सर्जरी झाली असून तो आधीपेक्षा बरा आहे. हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते असून सध्या डॉक्टरांनी नुरागला एक आठवडा आराम करायला सांगितले आहे. त्यानंतर तो आपल्या कामावर परत जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here