धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना पिक विमा भेटतो आणि जाणीवपूर्वक जळगाव जिल्हा पिक वीम्या पासून वंचित ठेवला जातो.
ऑक्टोबर महिन्यात जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले यात प्रमुख्याने कापूस सोयाबीन मूग उडीद ज्वारी बाजरी पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले प्रामुख्याने पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी कम्प्लेंट केल्यावर सुद्धा पिक विमा कंपनीने दुर्लक्ष केले
सततच्या नापिकीमुळे कधी अधिक पावसामुळे तर कधी पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल होत चालला आहे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो की काय अशी शंका शेतकऱ्यांचा मनामध्ये येत आहे शेतकरी अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे ओल्या दुष्काळामुळे व अवकाळी पावसामुळे अडचणीत आहे
ज्या पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित ठेवले त्या कंपनीवर शासनाने कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळवून द्यावा अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा धरणगाव शेतकरी कृती समितीच्या तालुका समन्वयक गोपाल पाटील यांनी दिला






