पंचरत्न मित्र मंडळ चेंबुरतर्फे वाशी गाव चेंबुर येथे अन्नधान्य व मास्क वाटप

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ तर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.

pancharatna-mitra-mandal-chambur

नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम, वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. कोविड-१९ काळातही लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले.

panchratna-mitra-mandal-mask-distribution

चेंबुर येथील वाशी गाव, मुंबई ७४ येथे प्रमुख पाहुणे सुहास शेलार (कार्यकारी संचालक आर.सी.एफ), पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, कविता संतोष शिंकतोडे(संचालिका- जि.एस.के महाविद्यालय) तसेच स्नेहा नानिवडेकर, वैभव घरत, हनुमंता चव्हाण, राजेश मेस्री, संदिप पाटील, निलम गावंड, डॉ. विनित गायकवाड यांच्याहस्ते अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले. प्रस्तावना स्नेहा नानिवडेकर यांनी करताना सांगितले की, पंचरत्न मित्र मंडळाने आजवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवश्यकच तेथे मदतीचा हात सातत्याने दिला आहे. देत आहे न यापुढेही देत राहिल. मंडळाचे कार्यकर्ते समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने सतत मदतीचा हात देत असतात.

pancharatna-mitra-mandal

प्रत्येकाने गरजूंना मदत करावी ही मदत करत असताना जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही. तर प्रमुख पाहुणे आर.सी.एफ कार्यकारी संचालक सुहास शेलार यांनी मंडळ राबवित असलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करा. स्वतः सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा मोलाचा सल्ला यानिमित्ताने दिला. कोविड-१९ चे सर्व नियमानुसार हा अन्नधान्य व मास्क वाटप कार्यक्रम अंत्यत साधेपणाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद, हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर यांनी तर आभार प्रदर्शन भोईर यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here