राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक, खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे

पिंपरी(पुणे) (प्रतिनिधी मनोहर दुसाने) – पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. आमदार बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि चार सह आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान आ.बनसोडेंनी त्यांच्यावर कंत्राटदार तसेच त्याचा मॅनेजर पवार याने जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे .

12 मे रोजी पिंपरीतील त्यांच्या कार्यालयाबाहेर कथीत गोळीबाराची घटना घडली होती. महापालिकेचा कंत्राटदार अँथोनीचा मॅनेजर तानाजी पवारने आपल्या दिशेने गोळीबार केल्याचा दावा आमदार अण्णा बनसोडे यांनी केला होता. तर आमदार पुत्रासह कार्यकर्ते जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याने बचावासाठी हवेत गोळीबार केल्याचा प्रतिदावा तानाजी पवारने केला आहे .

आमदार बनसोडे यांच्यावरील कथित गोळीबार प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार बनसोडे आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने पवारने केलाआहे. तसंच या घटना घडायच्या एक दिवस आधी अँथोनीच्या कार्यालयात घुसून दोन कर्मचाऱ्यांवरही जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातही आमदार पुत्र आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत आमदार पुत्रासह नऊ समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे. याशिवाय तानाजी पवारला पहिल्याच दिवशी अटक करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here