मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदाधिकाऱ्यांना आदेश!
धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.26 रोजी महाराष्ट्रातील सर्व उपजिल्हाप्रमुख,जिल्हा संघटक,तालुकाप्रमुख यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा बैठक घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, कोरोना काळात एकही शिवसैनिक मृत्युमुखी पडणार नाही याची काळजी घ्यावी आपण आपली स्वतःची काळजी घेऊन सर्व शिवसैनिक व जनतेला कोरोणा काळात आपण या अगोदरही सहकार्य केलेच आहे परंतु जोपर्यंत पूर्ण कोरोना मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत आपण आपल्या तालुक्यात कोविंड सेंटर असतील ग्रामीण रुग्णालय असतील, ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल तेथे आपली स्वतःची काळजी घेऊन रुग्णांना मदत करा कोरोना काळात एकही व्यक्ती मृत्यू होणार नाही अशा पद्धतीने सहकार्य करून त्यांना मदत करा मास्कचा वापर पूर्णपणे करा नाका-तोंडाला मास्क बांधा ते दाढीवर लटकवू नका तसेच सॅनिटायझरचा वापर करा कोरोना पूर्णपणे नाश होत नाही तोपर्यंत काळजी घ्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
धरणगाव तालुक्यातील सर्व जी.प सदस्य,प.स सदस्य,नगरसेवक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरात शिवसैनिका सह जनतेला कोरोना काळात पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आदेशवाईंनी मदत केलीच आहे परंतु मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सो यांच्या आदेशाने कोरोना मुक्त महाराष्ट्र होईपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले असून त्यांच्या आदेश सर्वांनी पाळून आपल्या सह जनतेची काळजी घेऊन कोरोना काळात कोणाचाही कोरोना ने मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना केले आहे.






