सील केलेल्या हॉटेलमधून दारूची विक्री

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने हॉटेल व्यवसायाबाबत काही नियम घालून दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करून ती हॉटेल्स सील करण्यात येत आहेत. दौंड तालुक्यातील कानगाव या गावातील अश्याच एका सील केलेल्या हॉटेलमधून दारू विक्री होत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी हॉटेल मालक व कामगार अशा दोघांना अटक केली आहे.

हॉटेल मालक नितीन एकनाथ फडके व दत्तात्रय भिमराव हत्तीकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून ४०७०/- रु. किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कानगाव येथील हॉटेल हनुमान नावाचे हॉटेल शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने दि. १५ मे २०२१ ला सीलबंद केले होते. हॉटेल सील असतानाही हॉटेल मालक हॉटेलचे पाठीमागील दार उघडे ठेवून त्याच्या ओळखीच्या लोकांना दारूची विक्री करीत होता. याबाबत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विजय किसन भापकर यांनी फिर्याद दिली असून हॉटेल मालक व कामगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here