कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषद शिक्षक मतदार संघातील आमदार जयंत आसगांवकर यांनी आज दि.२७ मे रोजी इचलकरंजी शहर परिसरातील शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत इचलकरंजी नगरपरिषदेस भेट दिली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांनी उपनगराध्यक्ष दालनात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच शिक्षकांना येणाऱ्या विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याची प्रमुख मागणी केली. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या मागणीनुसार शिक्षकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या तसेच अडचणींचे निराकरण तातडीने करण्याची ग्वाही, आमदार जयंत आसगांवकर यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी आरोग्य समिती सभापती संजय केंगार, शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, मा.नगराध्यक्षा श्रीमती.सुप्रिया गोंदकर, मा.उपनगराध्यक्ष रवि रजपुते, मा.बांधकाम सभापती भाऊसो आवळे, कॉ.सदा मलाबादे, मुख्याध्यापक,शाहू हायस्कूल. शंकर पोवार, शेखर शहा, नगर अभियंता संजय बागडे, मुख्य शाखा अभियंता बबन खोत, कोर्ट विभाग प्रमुख महादेव गोरडे तसेच इचलकरंजी शहरांतील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.






