इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास ३ व्हेंटिलेटर प्रदान

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – इचलकरंजी शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत वाढतच आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने कोरोना पॉझिटिव्ह असलेमुळे स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व नागरिकांच्या आरोग्याविषयी तळमळ त्यांना या परिस्थितीतही स्वस्थ बसू देत नाही. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांत अतिश्वसन त्रास असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर संख्या कमी असलेने खासदार धैर्यशील माने यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांस आज.दि.२७ मे रोजी ३ व्हेंटिलेटर विशेष प्रयत्नांतून मंजूर करून प्रदान करण्यांत आले.

खासदार कोरोना पॉझिटिव्ह असलेने स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यामुळे त्यांनी व्हिडियो कॉन्फरन्स घेऊन त्यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांत आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची प्रामुख्याने दखल घेऊन आपल्या सर्वांच्या सेवेसाठी लवकरच आपल्या सर्वांसोबत असू ,असे प्रतिपादन त्यांनी केले.

ichalkaranji

यावेळी३ व्हेंटिलेटर प्रदान करतांना नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा भा.ज.पा पक्षप्रतोद तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संजय केंगार, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र माने, नगरसेवक राहूल खंजिरे, मा.नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, शिवसेना मा.उपशहरप्रमुख धनाजी मोरे, भा.ज.पा.युवा मोर्चा सरचिटणीस प्रमोद बचाटे, वैद्यकीय अधीक्षक रविंद्र शेट्ये तसेच इचलकरंजी शहरांतील शिवसेनेचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here