राज्य विश्वकोष निर्मिती मंडळ सदस्यपदी डॉ. अरुण भोसले, डॉ. प्रकाश पवार यांची निवड

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या सदस्यपदी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा.डॉ.अरुण भोसले व राजकीय विश्लेषक व राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश पवार यांची निवड झाली आहे.

मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून सदस्य निवडीचा शासन निर्णय गुरुवारी झाला. डॉ. भोसले कलेडोण (जि.सातारा) येथील आहेत. 1972 ला एम.ए. केल्यानंतर वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. 1977 पासून शिवाजी विद्यापीठ इतिहास विभागात रूजू झाले. 1999 ते 2008 पर्यंत ते विभागप्रमुख होते. मराठा इतिहास संशोधन मंडळाचे संचालक होते. 2003 रोजी शिवाजी विद्यापीठ व त्यानंतर 2006 ला राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. दुसर्‍यांना सदस्यपदाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. विश्वकोष खंड पुनर्लेखन, विस्तार व नव्याने नोंदी करण्याचे काम येत्या काळात करण्याचा मानस आहे.

डॉ. पवार हे कळंब (वालचंदनगर, इंदापूर, जि. पुणे) येथील आहेत. त्यांनी 1995 रोजी आण्णासाहेब मगर महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून कारकीर्द सुरू केली. 2013 ला शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. 2017 ते 2019 या काळात ते राज्यशास्त्र विभागप्रमुख होते. डॉ. पवार यांची राज्यशास्त्राचे अभ्यासक व राजकीय विश्लेषक म्हणून राज्यभर ओळख आहे. राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने त्यांच्या दोन पुस्तकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here