उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीला परवानगी द्यायची की नाही याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. दरम्यान, गेल्यावर्षी कोविड स्थितीमुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा वारी होणार की नाही, याकडे वारकऱ्यांचे डोळे लागले असून आजतरी या प्रश्नाचे उत्तर मिळू शकलेले नाही.
आषाढीबाबत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आजच्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वारीला परवानगी द्यावी, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. मात्र, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या पाहता याबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ठरविण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय जाहीर करतील.







