पुणे (पंढरी गायकवाड) – आज (दि.२७) शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव पहाता तो रोखण्यासाठी शिवसेना प्रभाग क्रमांक 3 वडगावशेरी मतदार संघ पुणे या प्रभागाच्या प्रत्येक भागात औषध फवारणी करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शना नुसार कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राजू भाऊ सावंत, यानी केले. विशेष सहकार्य प्रशांत शिंदे, अशोक चोरघडे गणेश शेटे, उमेश नायकोडे यानी केले. उपक्रमाला प्रसाद जठार, विनोद कर्ताल विनोद परहाड, प्रदिप ढोकले, शंकर संगम, हर्षवर्धन पवार, राहुल शेडगे, रिन्कू शर्मा, संजय पासलकर, शिवाजी वडघुले, सचिन पगरिया, स्वप्निल घाडगे, मोह्मद शैख, शुभम वनजारे, अविनाश सुक्रे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.







