जळगाव जिल्हयात कोरोनाने ओलांडला दहा हजारांचा टप्पा

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज नव्याने 312 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. एकूण रुग्णसंख्या 10 हजार 44 झाली आहे. सर्वाधिक 63 कोरोबाधित रुग्ण हे जामनेर तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात 2 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच आहे. यात सोमवारी नव्याने 312 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यात जिल्ह्यात सोमवारी नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 41, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 10, अमळनेर 25, चोपडा 26, पाचोरा 8, भडगाव 11, धरणगाव 14, यावल 10, एरंडोल 3, जामनेर 63, रावेर 13, पारोळा 17, चाळीसगाव 43, मुक्ताईनगर 13, बोदवड 1 व इतर जिल्ह्यातील 3 अशी रूग्ण संख्या आहे. सोमवारी दिवसभरात 2 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here