ओ साहेब फोन उचला.बोला आणि मदत करा; कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – कांद्याला भाव मिळत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा पडून आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे एक पत्र लिहून ओ साहेब फोन उचला. बोला आणि मदत करा, असे लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात आले आहे, हे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्तपादक संघटनेचे अध्यक्ष भारत दीघोळे , राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव ,प्रवक्ते शैलंद्र पाटील , राज्य संघटक कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे ,सरचिटनिस दश्यांत पवार , व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी केले आहे
या पत्रात शेतकऱ्यांची व्यथा मांडतांना सांगितले आहे की, मी एक कांदा उत्पादक शेतकरी सर्वांना विनंती करतो की माझा कांदा आज रोजी सडत आहे. आणि मार्केटला नेल्यावर भाव पण भेटत नाही. तरी मी निवडून दिलेल्या माझ्या लोकप्रतिनिधीला फोन लावून माझा कांदा आज रोजी सडत आहे.4 ते 5 रु.प्रतिकिलो दराने मला परवडत नाही.आमचा कांदा 20 रु. प्रतिकिलो दराने खरेदी करावा व आमच्याकडे लक्ष द्या व मला न्याय मिळवून द्या ही विनंती करत करणार आहे. मी स्वतः 28 तारखेला त्यांना फोन लावून ही विनंती करणार आहे. आज रोजी ज्यांच्याकडे कांदा शिल्लक आहे. आणि त्यांचीपन माझ्यासारखी वाईट परिस्थिती झाली आहे त्यांनी पण त्यांच्या लोकप्रतिनिधी यांना फोन लावून विनंती करावी. नक्कीच सर्व लोकप्रतिनिधी न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा करूयात.आणि ते आपल्याला मदत करतील हा विश्वास आहेच कारण आपण पण ह्या देशाचे ह्या राज्याचे नागरिक आहोत.आपणच त्यांना निवडून दिले आहे. आणि आपला त्यांचेवर एव्हढा तर हक्क नक्कीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here