चित्रीकरण केले म्हणून जालना पोलिसांची भाजपा कार्यकर्त्यास बेदम मारहाण; फौजदारासह पाच शिपाई निलंबित

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालन्यातील पोलिसांचे शूटिंग केले, म्हणून पोलिसांनी भाजप कार्यकर्ते शिवराज नारियलवाले यांना काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, बबनराव लोणीकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील यांनी केलेल्या विविध तक्रारीवरुन जालन्यातील फौजदारासह पाच शिपायांवर कारवाई करण्यात आली आहे.

जालन्यातील भाजपचे कार्यकर्ते शिवराज नारायण वाले यांनी शिवीगाळ करत असलेल्या पोलिसांची चित्रफित काढले होती. त्यावरून पोलिसांनी त्यांना आत बोलावून हॉस्पिटलमध्ये बेदम मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहताच देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री बबनराव लोणीकर व इंदापूरच्या तुषार झेंडे यांनी तक्रारी केल्या.

यामध्ये देवेंद्र फडणीस यांनी सरकारकडे तक्रार केली होती, तर झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी याची गंभीर दखल घेत फौजदार भागवत कदम, पोलीस शिपाई सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळुंके आणि महेंद्र भारसाकळे यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान या शिपायाखेरीज व फौजदाराखेरीज आणखीही वरिष्ठ अधिकारी या मारहाणीत सहभागी होते. त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे? असा प्रश्न ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान वरिष्ठांवर कारवाई होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, या तक्रारीचा पाठपुरावा करू असे देखील झेंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here