प्रवरा कोविड सेंटरला साई निर्माण उद्योग समूहाच्या वतीने १ लाख रू मदत

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज श्री साई निर्माण उद्योग समूहाच्या वतीने लोणी येथील प्रवरा कोविड सेंटर मधील रूग्णांच्या उपचारासाठी रू एक लाखाची मदत शिर्डी मतदार संघाचे आमदार मा. विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

यावेळी साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन श्री विजय कोते पा, उपाध्यक्ष श्री पंकज लोढा, लोणी येथील साई सुहास टॅावरचे सुहास घोगरे पा, साई सिंधू डेव्हलपर्सचे श्री संजय मुसळे पा, श्री महेश औताडे, श्री योगेश जी बिहाणी, हाजी. मुन्नाभाई शहा, श्री किरणजी आहेर, श्री संदिप खर्डे पा, श्री दशरथ जी गव्हाणे पा. उपस्थित होते.
सन्मा. विखे साहेब व युवा खासदार डॅा. सुजय दादा विखे पाटील यांनी लोणी येथे प्रवरा कोविड सेंटर सुरू करून परिसरातील कोविड रूग्णांना चांगले उपचार व सुविधा मिळाव्यात या हेतूने कोविड सेंटर सुरू केले व आज पर्यंत हजारो सर्वसामान्य नागरीकांना याचा फायदा झाला असून अतिशय चांगल्या पध्दतीने या कोविड सेंटर मध्ये रूग्णांना उपचार दिले जात आहे.

स्वतः विखे साहेब व डॉ. सुजय दादा या कोविड सेंटर वर लक्ष ठेवून आहेत. साहेबांनी प्रवरा कोविड सेंटर सुरू केले आणी परिसरातील संस्था, साहेबांबरोबर काम करणारे विविध पदावरील पदाधिकारी, सामाजिक संघटना अशा सर्वांनी आपण हि या रूग्णांना काहीतरी मदत करावी या हेतूने या कोविड सेंटरला मदतीचा हात देवू लागले व देत आहेत. याच प्रेरणेने साई निर्माण उद्योग समूहाचे चेअरमन व सर्व सदस्यांनी आपला ही हातभार या रूणांना मिळावा यासाठी आज हा एक लाख रू. धनादेश मा. विखे साहेब यांच्याकडे सुपूर्त केला… यावेळी सन्मा. विखे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले.

त्याच प्रमाणे साई निर्माण ग्रूप व साई द्वारकामाई प्रतिष्ठाणच्या वतीने मागील व आत्ताच्या सुरू असलेल्या लॅाकडाऊन मध्ये साईबाबांच्या चावडी व द्वारकामाई समोरील हातावर पोट असणाऱ्या गरीब घरातील मुले व महिलांना 300 किराणा किटचे वाटप असेल, रोख स्वरूपातील मदत असेल, शिर्डीतील 500 कुटूंबांना द्राक्ष, टरबूज, खरबूज या फळांचे वाटप असेल, साईनाथ हॅास्पीटलला 20 बॅाक्स हॅन्डग्लोज, सॅनीटायझर असेल, साईबाबा कोविड सेंटर मधील रूग्ण व कर्मचारी यांना 700 अंडी व 750 पॅकेट फळं व राजगीऱ्याच्या लाडूंचे वाटप असेल, डॅा. सुजयदादां मार्फत गरज असलेल्या रूग्णांना रेमडिसिविर इंजेक्शनचा पुरवठा असेल, शिर्डी नगरपंचायतच्या 250 स्वच्छता कर्मचारी यांना फळांचे वाटप असेल, परिसरातील वाड्या वस्त्यांवरील हातावर पोट असणाऱ्या 1500 कुटूंबांना किराण्याचे वाटप असेल, 14, 15 व 16 नंबरच्या वार्डातील 900 कुटुंबांना व्होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप असेल, मंदिर परिसरातील 200 भिक्षेकरूंना दर आठवल्याला तांदळाच्या खिचडीचे वाटप असेल हि सर्व मदत करण्याचे पूण्य काम श्री साईबाबांच्या आशिर्वादाने व मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सुरू आहे, या साठी साई निर्माण ग्रूपच्या व साई द्वारकामाई प्रतिष्ठाणच्या सदस्यांची मदत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here