मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित त्यानी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व शिवसेना नेते युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देशानुसार कोरोना महामारीच्या काळात एक सामाजिक बांधिलकी म्हणून व संजय सावंत, समाधान पाटील, गुलाबराव वाघ व शरद भाऊ तायडे यांचे सहकार्याने व कुणाल दराडे (युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य), किशोर भोसले (विस्तारक महाराष्ट्रा राज्य) यांचे पुढाकाराने आज युवासेना जळगाव जिल्हा यांच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या काळात जळगाव शहरातील स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्नधान्य व किराणा माल वाटप करण्यात आले व त्याचे आभार मानून सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, युवासेना महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, युवासेनेचे महेश ठाकूर,यशश्री वाघ,जय मेहता,रोहित शिरसाठ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here