सचिन पायलट यांना जोर का झटका!

जयपूर – राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. बसपाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये विलनीकरणासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात निकाली निघाली आहे. दरम्यान, राजस्थान हायकोर्टात राज्यपाल कलराज मिश्रा यांना पदावरून हटविण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली आहे. याशिवाय सचिन पायलट यांना पाठिंबा देणारे ३ आमदार परत येणार आहेत. असा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला.
राजस्थानच्या राज्यपालांना पदावरुन हटवण्यासाठी सोमवारी राजस्थान हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राज्यपाल कलराज मिश्रा प्रामाणिकपणे काम करत नाहीत, असे या याचिकेमध्ये म्हटले आहे. ही जनहित याचिका वकील शांतनु परिक यांनी दाखल केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विधानसभेचे अधिवेशन बोलावत आहेत. पण राज्यपालांनी त्याला परवानगी दिली नाही.
सचिन पायलट यांच्या सोबत असलेल्या १९ आमदारांपैकी ३ आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये परत येत आहेत. असे सूत्रांचे म्हणणे आहे. हाॅटेल फेअरमाऊंट येथे बोलताना काँग्रेस नेते सुरजेवाला म्हणाले की, येत्या ४८ तासात तीन आमदार काँग्रेससोबत येणार आहेत. मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
या प्रकरणात मदन दिवावर यांच्या वतीने राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ती फेटाळून लावली आहे. या प्रकरणात बसपाने स्वत: ला पक्षकार बनविण्यासाठी याचिकादेखील दाखल केली होती, परंतु उच्च न्यायालयानेही त्याला नकार दिला आहे. आता बसपाला याचिका दाखल करायची असेल तर त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here