भारताची आणखी चिनी ४७ ॲप्सवर बंदी

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा भारत सरकार चीनवर डिजिटल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी भारताने याआधी ५९ ॲप्स र बंदी घालत चीनला अर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
अधिक माहितीनुसार, ४७ अ‍ॅप्स हे आधीच्या ५९ अ‍ॅप्सचे क्लोन आहेत. कोणत्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, या अ‍ॅप्सची नाव समोर आलेली नाहीत. तसेच या अ‍ॅप्सच्या बंदी संबंधी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
भारताने आत्तापर्यंत एकूण १०६ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने २७५ चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासाठी एक यादी तयार केली आहे. या सर्वांवर बंदी घालण्यात येणार आहे. या यादीत पबजी आणि जिली यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. तसेच, कॅपकट, फेसयू, Meitu, एलबीई टेक, परफेक्ट कॉर्प, सीना कॉर्प, नेटीज गेम्स, अलीएक्सप्रेस, रेसो आणि यूलाइक या अ‍ॅप्सचादेखील समावेश समावेश असल्याचे समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here