मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे एकच गोंधळ उडाला आहे. एका निनावी फोनने मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे बॉम्बनाशक पथक बॉम्बचा शोध घेत आहे.

आज दुपारी मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन आला होता. मंत्रालयातील कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. त्यामुळे तातडीने यंत्रणा जागी झाली आणि सर्वत्र शोध सुरू झाला. मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील संपूर्ण परिसरात बॉम्ब आहे का याचा तपास सुरू आहे.

खबरदारी म्हणून सर्व गेट बंद करण्यात आले आहे. सुदैवाने आज रविवार असल्यामुळे मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. तसंच कोरोनाच्या नियामवलीमुळेसुद्धा कर्मचाऱ्यांची कमीच उपस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here