शिर्डी न.पं.चे भाजपाचे मा.नगरसेवक सुरेश आरणे यांचा ना.थोरात साहेबांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश..

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – भाजपाचे मा.शिर्डी शहर उपाध्यक्ष तसेच मा.नगरसेवक श्री सुरेश आरणे यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब,काँग्रेसचे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे नेते सुरेश थोरात,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर,जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी,शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले,युवक शहराध्यक्ष अमृत गायके उपस्थित होते.

काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेसने गोरगरिबांसह प्रत्येक घटकाकरिता घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे,सर्वांनी एक दिलाने काम करत असताना काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करावे.अशा सूचना ना.थोरात साहेब यांनी यावेळी केल्या. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये तरुणांचा प्रचंड ओघ सुरू आहे. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्याला प्राधान्य देत पक्षवाढीसाठी काम करावे असे यावेळी आ.डॉ.तांबे म्हणाले.

शिर्डी शहरातील गुलाब विक्री करणारे,शिर्डी गाईड्स,फेरीवाले यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवीण्या बरोबरच गोरगरिबांच्या समस्यांना घेऊन सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांचा काँग्रेसमध्ये योग्य तो सन्मान केला जाईल.त्याच बरोबर तळागाळातील बेधडक तरुणांना सोबत घेऊन शिर्डी शहरातील काँग्रेस बळकट करत असताना आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधातील लढा यशस्वीपणे लढला जाईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here