जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदा आयोजित विविध उपक्रमांची रेलचेल

ठाणे (सुभाष शांताराम जैन) – दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, २०२१ ची थीम ‘ecosystem restoration’ अशी आहे.विविध देशांना जागतिक पातळीवर आपली कल्पकता दाखविण्याची संधी प्राप्त होते . यंदा अभिमानाची बाब म्हणजे नवीन संकल्पना राबविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यसंपदाच्या दोन उपक्रमांना ह्यात मान्यता मिळाली आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकेत स्थळावर साहित्यसंपदाचे नाव झळकताना पाहून सर्व मराठी माणसांचा उर अभिमानाने भरून आला.

दिनांक ५जुन २१ रोजी उपक्रम नियोजित पार पडतील . साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमाची आखणी झाली आहे . #call to _wakeup for_nature ह्या अभियानातून विविध विषयांवरील चर्चा सत्रे पार पडणार असून ह्यात धोकादायक /संकटात सापडलेल्या प्रजातींना मदत करणे ,हवा आणि पाणी शुद्धीकरण ,मातीच्या सुपीकतेचे पुनर्जन्म आणि पिकांचे परागकण या परिसंस्थेच्या प्रक्रियेसाठी महत्वपूर्ण बाबींवर चर्चा होऊन तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे .

sahitya-sampada-world-environment-day

यंदा कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन असल्याने यावेळी हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. घरात राहून पर्यावरण दिवस साजरा करण्यासोबत पर्यावरणाच्या क्षेत्रात चळवळ, जनजागृती, संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या लेखक, पर्यावरणतज्ञ आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखतीं मधून त्यांच्या कार्याचा शब्द गौरव करण्यात येणार आहे.पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिवसामागील उद्देश आहे. हेच हेरून मराठी साहित्याच्या मदतीने कथावाचन कवितावाचन ह्यांच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जागृती केली जाणार आहे .

ऑनलाईन प्रश्न मंजुषा घेण्यात येणार असून ,निबंध /लेख ह्यांसाठी विषय देण्यात येणार आहेत. त्यांचे ऑनलाईन वाचन केले जाणार आहे,सदर उपक्रम सर्वांसाठी खुला असेल . .विशेष म्हणजे #grow_for_tommrow ह्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीस भर देण्यासोबत वृक्ष प्रेमींची ओळख समाजास करून देण्यात येणार आहे. बालपणापासूनच मुलांची पर्यावरणाशी मैत्री व्हावी म्हणून “माझा मित्र ,माझं झाड ” ही स्पर्धा घेण्यात येणार उपक्रमातील सर्व सहभागींना आकर्षक इ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाची जवाबदारी मनोमय मीडिया सांभाळणार आहेत . अशी माहिती साहित्य संपदा संस्थापक वैभव धनावडे(९९३००८०३७५/८१०८५०७८०९ ) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here