ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुंबई (जॉनी वाझ) – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून अभिषेक बच्चनने ट्विटरवर याविषयीची मााहिती दिली. त्याचसोबत त्याने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले.
‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असं ट्विट अभिषेकने केलं.
ऐश्वर्या व आराध्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं.
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने उतरवला आहे. ११ जुलै रोजी हा बंगला सील करण्यात आला होता. आता या बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here