दुबई – दुबईत एका तरुणाने त्याच्या पत्नीची विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या केली. या हत्येप्रकरणी या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९ सप्टेंबर २०१९ रोजी दुबईत राहणाऱ्या युगेश नावाच्या तरुणाने त्याच्या पत्नीची दिवसा ढवळ्या चाकूने भोसकून हत्या केली. याच प्रकरणात या तरुणाला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गल्फ न्यूजने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
पत्नीची हत्या केल्याप्रकरणी दुबई कोर्टात खटला सुरु होता. आरोपी युगेशला शिक्षा सुनावण्यात आली आहे. हत्येपूर्वी युगेश एका वर्षापासून पत्नीवर अत्याचार करत होता, असा आरोप युगेशच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी केला आहे.







