मुंबई (हितेश मिस्त्री) – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहे. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार सायंकाळच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वांद्रे येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांचे अभीष्टचिंतन केले. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.







