महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान

  • कोरोनायोद्ध्यांचे मनोबल वाढावे या उद्देशाने राबविला उपक्रम
  • चोपडा शिवसेनेतर्फे राबविला स्तुत्य उपक्रम

चोपडा (संदीप ओली) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व चोपडा विधानसभेच्या विद्यमान आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्यावतीने चोपडा तालुक्यात कोरोनाच्या काळात कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या चोपडा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,वार्ड बॉय,नर्स,पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन इत्यादी कर्मचाऱ्यांचा शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रम चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमप्रसंगी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.मनोज पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारीडॉ.प्रदीप लासूरकर,पोलिस उपनिरीक्षक संदीप आराक यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यात तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील,शहरप्रमुख आबा देशमुख, शहर प्रमुख नरेश महाजन,जिल्हा महिला आघाडी प्रमुख रोहिणीताई पाटील,जि.प.सदस्य हरीश पाटील,मा.उपसभापती एम.व्ही.पाटील,न.पा.गटनेता महेश पवार,नगरसेवक किशोर चौधरी,नगरसेवक राजाराम पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य एस.डी.सोनवणे,तालुका संघटक सुकलाल कोळी,दीपक चौधरी,गोपाल चौधरी,डॉ रोहन पाटील,सुनील पाटील,नंदू गवळी प्रा.प्रिती सरवैय्या,तुषार पाटील,गोलू मराठे,भरत साळुंके इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.त्यात डॉ. मनोज पाटील,डॉ.गुरुप्रसाद वाघ, डॉ.शरद पाटील,डॉ.पुनम पाटील, डॉ श्रद्धा पवार,डॉ राजाभाऊ चव्हाण,डॉ.किरण पाटील,डॉ. धनंजय पाटील,डॉ.महेंद्र पाटील, डॉ.अक्षय पाटील,डॉ.नरेंद्र पाटील,डॉ.राहूल पाटील, डॉ. राहुल चौधरी,डॉ.विनायक पाटील,डॉ दिनेश चौधरी,डॉ. पंकज पाटील,डॉ.दिपक पाटील, डॉ.मयूर सोनवणे,डॉ.विश्वास पाटील,डॉ.स्नेहा सोनार,डॉ. मोनिका हांडे,डॉ.अमित देसले याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक राकेश भामरे,दिपक गोराणे,वाहन चालक सुरज डोंगरे,कक्षसेवक सुरेश चावरे,गोपाल खैरनार, विलास टेके,हंसराज बिऱ्हाडे,विनोद चावडे,चंद्रकांत पाटील,सफाई कामगार राहुल दाभाडे,प्रशांत मामु,ऋषी महाजन,मयुर नेवे,राकेश पाटील इत्यादी कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख यांनी केले तर मनोगत एम.व्हि.पाटील यांनी व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार डॉ मनोज पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here