दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले

नागपूर (प्रतिनिधी) – अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. नागपुरातील जनता कर्फ्यू संपून काही तास होत नाहीत, तोच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपुरातील बेसा परिसरात असलेल्या कल्यानेश्वर नगरमध्ये ही घटना घडली. मयत महिला किरण बरमेया (29) यांचे शिवा नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पती कुंवरलाल भारत बरमेया (40) याला होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे.
अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी पतीने पत्नी किरण आणि तिचा मित्र शिवा यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी पती भारत बरमेयाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
नागपूर आयुक्तालयातील अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here