मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात वाद होण्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांच्यात असे काहीही वाद नसल्याचे करण मेहराने मुलाखती दरम्यान स्पष्ट केले होते. पण, नुकतच आता करण मेहराला अटक करण्याची बातमी समोर आली आहे.
सोमवारी करण व निशा या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे करण आणि निशामध्ये मोठे भांडण झाले होते. याच भांडणाचा राग डोक्यात धरून करणने निशाला मारहाण केल्याची माहिती समोर आली. आपल्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री करण मेहराला अटक केली आहे. या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.
करणला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. या मालिकेच्या माध्यमातून त्याला लोकप्रियता देखील मिळाली. मालिकेत अभिनेत्री हिना खानने करणच्या पत्नीची भूमिका साकारली होती.






