नगर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या निधनानंतर कुटुंब सावरण्याआधीच आणखी दोन मोठे धक्के बसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांताबाई यांची कन्या आणि नातवाचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अनिता उर्फ बेबीताई असं मुलीचं नाव असून अभिजित उर्फ बबलू असं नातवाचं नाव आहे. अगदी १५ दिवसांमध्ये तिघांचाही करोनाने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. 25 तारखेला कांताबाई यांचं निधन झालं होतं. मात्र, त्या जाण्याअगोदरच त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई करोनाने गेल्या. यानंतर त्यांचा नातू बबलू याचंही करोनाने निधन झालं.
अधिक माहितीनुसार, काही दिवसांआधी खेडकर कुटुंबियांना करोनाचा संसर्ग झाला होता. अनिता यांचे संगमनेरमध्ये तर अभिजित याचे नाशिकमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले.






