जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग 9मध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जनमत प्रतिष्ठानकडून विनामूल्य कोविड १९ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन विवेक सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ मुक्ताई महिला संस्थेच्या अध्यक्ष व नगरसेविका नीताताई मंगलसिंग सोनवणे यांनी केला. तसेच पोलीस विभागाचे विश्वास पवार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा कॉलनीवासियांकडून सत्कार करण्यात आला, प्रभागातील बहुसंख्य लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली व प्रभागातील बऱ्याच नागरिकांनी ॲण्टीजेन टेस्ट करून घेतली.
याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे योगेश सपकाळे,दिनेश तेजी सहकार्य लाभले,पोलीस सेवा संघटनेच्या हर्षाली पाटील , अंबु बाई शांताराम पाटील,शांताराम पाटील सागर कोळी,राजेंद्र कुमार वर्मा सर संजय कुमार सिंग, आर सी पाटील ,राहुल निकम,विजय सोनवणे हेमंत वैद्य, राहुल लोखंडे,गणेश फेगडे,शक्ती महाजन,अनुजा निकम यांची उपस्थिती लाभली, कार्यक्रमाचे नियोजन पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.






