शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनोच्या प्रभावाने दिवसेंदिवस लहान मुलांची संख्या वाढत असल्या कारणाने लहान मुलाचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष करण्यात यावे यासाठी शिवसेना तालुका प्रमुख मा. संजय आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली शिर्डी येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना युवा सेनेच्या वतीने निवदेन देण्यात आले.
यावेळी युवा सेनेचे युवा नेते मा.प्रसाद पाटील, अमर रावसाहेब गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय तळेकर, युवा सेना उपतालुका प्रमुख प्रताप निर्मळ, विशाल बागुल, संकेत पैठनकर, सद्दाम ईनामदार, विशाल उपाधे, प्रवीण गोरपडे, कृष्णा परखे, सागर हिवाळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.






