नाशिक (विशेष प्रतिनिधी) – वसंतराव दादा सह साखर, कारखान्याचे सिनिअर इंजिनिअर कुबेरबापु जाधव यांची महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या देवळा तालुका समन्वयकपदी नुकतीच निवड झाली आहे. तसेच कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरजवंतांना केलेल्या मदतीचे प्रतीक म्हणून त्यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे को जन.इंजि. संतोष कचोर व दीपक झाल्टे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लोहणेरचे भुमिपुत्र मधुकर आहेर हे कारखान्याच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचाही सुरक्षा विभागातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्काररुपी निरोप देण्यात आला.







