मुंबई (जिल्हा प्रतिनिधी संतोष कृष्णा जाधव) – सध्या कोरोनाच्या संकटकाळात हातावर पोट असलेल्या नागरिकांना एक वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ता व संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्याचे अँड.अजय तापकीर यांच्या वाढदिवस दिनांक १ जून रोजी दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा न करता श्री.गाडगे महाराज मिशन संचालित श्री.माफतलाल मोहनलाल मेहता धर्मशाळा ट्रस्ट,सेंट जॉर्ज रुग्णालय दाखल होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देऊन व अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ता व संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्याचे अँड.अजय तापकीर यांच्या वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा केला.दरवर्षीप्रमाणे धूमधडाक्यात वाढदिवस साजरा न करता मेहता धर्मशाळा ट्रस्ट व सेंट जॉर्ज रुग्णालयात रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करू,अशी कल्पना त्यांना सुचली. त्याप्रमाणे त्यांनी परीसरातील लोकांना अन्नदान करून वाढदिवस साजरा केला.दरवर्षी अँड.अजय तापकीरचा वाढदिवस गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यावाटप,गणवेशवाटप,आजारी रुग्णांना फळवाटप,वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांनी साजरा होत होता, परंतु या वर्षी कोणताही बडेजावपणा न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अँड.अजय तापकीरचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नीरज कडू पुणे जिल्हा संघटक आणि सहकारी, मुंबई प्रसिध्दी प्रमुख श्री जिवजीत विश्वकर्मा चंद्रकांत उत्तेकर ठाणे अध्यक्ष कामगार विभाग,महेश दाभोलकर मुंबई अध्यक्ष विद्यार्थी आघाडी,मच्छिंद्र जाधव उत्तर पश्चिम जिल्हा प्रमुख पूर्व विभाग,सलीम भाई,उत्तर पश्चिम जिल्हा प्रमुख पश्चिम विभाग,मिलींद गवई दिंडोशी विधानसभा उपाध्यक्ष,श्री कृष्णा विश्वकर्मा वॉर्ड क्रमांक ४० चे अध्यक्ष, दत्ताराम वाकचौरे वॉर्ड क्रमांक ४१ चे अध्यक्ष,पंकज सोनी वॉर्ड क्र ४०चे सचिव,काशीनाथ सागरे,वॉर्ड क्र ४० चे उपाध्यक्ष,भगवान मस्के,वॉर्ड क्र ४० चे उपाध्यक्ष,सुधाकर माळोदे प्रहार समर्थक,अमर गौड प्रहार सैनिक,मानखुर्द विधान सभाचे सर्व पदाधिकार व प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.






