रोटरी सिनियर्सतर्फे दोडाईचात कोविड रुग्णांसाठी सेंट्रल आँक्सिजन सिस्टीम व स्वँब बुथ

दोंडाईचा (संतोष कोळी) – काल (दि.२७) दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी सेंट्रल आँक्सिजन सिस्टीम व कोविड सँम्पल कलेक्शन बुथचे लोकार्पण आमदार जयकुमार रावल यांच्याहस्ते झाले याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव राजेश माखिजा,राजेश मुणोत ,भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन , नगरसेवक हितेंद्र महाले, निखिल जाधव ,जितेंद्र गिरासे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अर्जुन नरोटे, डॉ हितेंद्र देशमुख , डॉ सचिन पारख ,डॉ प्रफुल्ल दुग्गड डॉ अमोल भामरे , इ मान्यवर उपस्थित होते .
आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की दोंडाईचा शहर व परिसरात कोरोनाचे अनेक रुग्ण दररोज आढळत आहेत त्यात दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक रुग्णांना प्राणवायुची गरज भासत असते सध्यास्थितीत दोनच रुग्णांना प्राणवायू लावता येणे शक्य होते त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांना धुळे किंवा इतरत्र स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय नव्हता शिवाय इतर हाँस्पीटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत म्हणुन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या माध्यमातुन सदस्यांनी स्वखर्चाने कोविड रुग्ण विभागात किमान १२ रुग्णांना एकाचवेळी अखंडीत आँक्सिजन देता येईल अशी सेंट्रल आँक्सिजन सिस्टीम बसवुन देण्यात आली त्यात मोठे ४ सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले तसेच रुग्णांचे कोविड तपासणीसाठी नमुने घेतांना रुग्णांच्या घशातुन समोर उभे राहुन स्वँब घेतल्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारींनासुद्धा कोरोनाची बाधा होत असते त्यामुळे नमुने घेणारे अधिकारींच्या सुरक्षतेसाठी संपुर्ण सुरक्षित कोविड नमुना तपासणी कक्ष बनवीण्यात आले असुन त्याचे उपजिल्हा रुग्णालयात लोकार्पण करतांना दोडांईचेकरातर्फे रोटरी सिनियर्सचे सर्व सदस्य अभिनंदनास पात्र आहेत असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश मुणोत यांनी करतांना सांगितले की कोरोनाच्या काळात उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध साधनसामग्रीत जीव ओतून रुग्णांची सेवा करीत आहेत पण आपले देखील कर्तव्य आहे कि त्यांना शक्य असेल ती मदत केली पाहिजे . सूत्रसंचालन प्रविण महाजन यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल सोहनी ,राजेश भंडारी ,हुसेन विरदेलवाला ,अँड नितीन अयाचीत , राजेंद्र परदेसी ,डॉ राजेंद्र पाटील , डॉ राजेंद्र गुजराथी ,शेखर कोठारी , महेंद्र चोपडा ,डॉ अनिल धनगर ,जवाहर केसवानी , डॉ अनिकेत मंडाले इ सदस्यांनी प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here