दोंडाईचा (संतोष कोळी) – काल (दि.२७) शिवसेना दोंडाईचा शहरातर्फे,शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षरोपणाचा तथा वृक्षरोपवाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने,तसेच संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात आणि जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली,दोंडाईचा शहरात सिंधी कॉलनी परिसरातून वृक्षारोपणाचे सुरुवात करण्यात आली. त्यानंतर म्हाळसानगर येथील श्रीरामराज्य चौकात,नंतर महादेवपुरा परिसरातील भगवा चौक,अमरावती नदीकाठ आणि गाव भागातील आजाद चौक आणि शिवराजे येथे वृक्षारोपण त्या त्या परिसरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राका सेठ,उपशहर प्रमुख आबा चित्ते,राकेश पेटकर,विजु भोई,किरण सावळे,राजधर कोळी आणी युवा सेनेचे सागर पवार,अजय विसावे,संदीप वाघ,हर्षल ठाकुर,दिपक ओतारी,शिवराजे चौकाचे दिपक मराठे,तसेच श्री रामराज्य ग्रुप,भगवा चौक मित्रमंडळ,जय श्रीराम ग्रुप,जय बजरंग ग्रुप महादेवपुरा,बापजी ग्रुप दोंडाईचा,आझाद आणी निंबा चौक या सर्व मित्र मंडळाचे सदस्यांसोबत पिंटु महाजन,शशी बडगुजर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची संकल्पना,नियोजन आणी यशस्वीतेसाठी शिवसेना दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपूत आणी युवासेनेचे दोंडाईचा विभागीय तालुकाप्रमुख आकाश कोळी यांच्या सुचनेनुसार सर्व शिवसैनिक आणी युवासैनिकांनी मेहनत घेतली.
Home Uncategorized शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त दोंडाईचा शहरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम...







