महावितरण विरुद्धच्या आंदोलनात सर्वपक्षिय पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरीकांची उपस्थिती

विजबिल महिन्याप्रमाणे लावावे अन्यथा आमरण उपोषणाचा दिला इशारा

चोपडा (संदीप ओली) – तालुक्यातील वाढीव विज बिलांबाबत दि.२७ जुलै रोजी स.११ वा. चोपडा तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते,परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारल्याने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून तहसीलदार अनिल गावित यांच्या दालनात वीजमंडळाचे अधिकारी श्री.सावकारे यांचेशी विजग्राहकांनी सुमारे एक तास चर्चा केली,परंतु शंकांचे निरसन न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी लॉकडाऊन नंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन त्या आशयाचे निवेदन लगेच तहसिलदारांना दिले.संबंधित महावितरणच्या अधिकार्यांनी हा विषय शासनस्तरावर पाठविणार असल्याचे सांगितले.निवेदनात तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल रद्द करून प्रतिमाह युनिट दरानुसार नवीन वीजबिल देण्यात यावे,तोपर्यंत वीज बिलांची वसुली करण्यात येऊ नये,वीज जोडणी करण्यात येऊ नये,ह्या मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांचेकडे स्वहस्ताक्षरात लिहून पाठवलेल्या निवेदनाची प्रत तहसील कार्यालयाकडे पाठवली.व आंदोलनकर्त्यांना भ्रमणध्वनीद्वारे ठिय्या आंदोलन थांबवण्याची विनंती करून यासाठी माझाही पाठिंबा आहे,असे नमूद केले. अशी माहिती आंदोलनाचे प्रमुख जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी दिली.
याप्रसंगी आंदोलनकर्ते जगन्नाथ टि.बाविस्कर,मधुसूदन बाविस्कर,लखीचंद बाविस्कर, मुरलीधर बाविस्कर,सागर सोळुंके,वैभवराज बाविस्कर यांचेसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के.डी.चौधरी, भाजपाचे पं.स.उपसभापती भूषण भिल,युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, आदर्शगाव हातेड बुद्रुक चे माजी सरपंच मनोज सनेर,चोसाका संचालक अनिल पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर कन्हैय्ये,नंदकिशोर देशमुख,समाजसेवक शरद बी. पाटील,शामसिंग परदेसी,विजय बाविस्कर,जीवन पाटील, आदिवासी भिल्लसमाज संघटनेचे धोंडीराम गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण निकम, शाम नगराळे,सुनील सोनवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर पाटील,रमेश शिंदे, अकबर पिंजारी,इलियास पटेल, श्रीकृष्ण शिरसाठ,मोतीलाल रायसिंग,संजय सैंदाणे,सतिष बाविस्कर,भगवान कोळी, जी.आर.पाटील,विशालराज बाविस्कर,दत्तात्रय पाटील,विनोद पाटील,पवन जैस्वाल,धरमदास पाटील,रामचंद्र बाविस्कर,संजय पाटिल,राजेंद्र पाटील,सुभाष पाटील,अक्षय पाटील,चेतन बाविस्कर,पुष्कराज नेरपगारे, जीवन बागुल,सूर्यकांत चौधरी,विशाल भिल,योगेश बडगुजर,रोहित बडगुजर,दिपक सावळे, दीपक पाटील,विजय धनगर,दीपक परदेशी, सुनील चौधरी, चिंतामण पाटील,भुषण पाटील, रावसाहेब बाविस्कर, किशोर महाजन,योगेश महाजन, रवींद्र पाटील,अभिजित पाटील, मनोज पाटील,हिरालाल बाविस्कर,देविदास बाविस्कर, गोरख पाटील, वासुदेव पाटील, लोटन पाटील, मनोहर पाटील, पंकज कोळी, धोंडू कोळी, विकास कोळी,नरेंद्र पाटील,नाना महाराज यांच्यासह असंख्य विजग्राहकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here