राजगढ (मध्यप्रदेश) – इथे एका ३५ वर्षीय महिलेने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं. इतकं नाही तर महिलेच्या पती आणि सासू-सासऱ्यांनी मुलाच्या परिवाराला हे प्रकरण दाबण्यासाठी १ लाख रूपयांची मागणीही केली. जेव्हा मुलाच्या परिवाराने पैसे देण्यास नकार दिला तर त्यांना खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या परिवाराला अटक केली आहे.
राजगढचे एसपी प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, महिलेने गावातच राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचं दोन वेळा लैंगिक शोषण केलं. जेव्हा याबाबत महिलेच्या परिवाराला खबर लागली तेव्हा महिलेचा पती आणि तिच्या सासू-सासऱ्यांनी २७ मे रोजी मुलाच्या परिवाराकडे १ लाख रूपयांची मागणी केली. मुलाच्या परिवाराने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा महिलेने आणि तिच्या परिवाराने मुलाला खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
महिलेच्या परिवाराने मुलाच्या परिवारावर पैसे देण्यासाठी खूप दबाव टाकला. पण मुलाच्या परिवाराने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेच्या पतीने आणि सासऱ्यांनी त्यांच्या शेतातील पपईची झाडे तोडली. महिला आणि तिच्या परिवाराच्या दबावाला वैतागून अल्पवयीन मुलाने राजगढ चाइल्ड लाइनमध्ये फोन करून या घटनेची माहिती दिली. चाइल्डलाइन राजगढचे काउन्सेलर मनीष दांगीने मुलाचं काउन्सेलिंग केलं आणि सोमवारी याबाबत पोलिसांना माहिती दिली.






